माकडटोपी न दिल्याने कैद्याकडून कैद्याची हत्या

माकडटोपी न दिल्याने एका कैद्याने दुसऱ्या कैद्याची हत्या केल्याची घटना नाशिक जेलमध्ये घडली आहे.

Updated: Sep 14, 2016, 11:31 AM IST
माकडटोपी न दिल्याने कैद्याकडून कैद्याची हत्या title=

नाशिक : माकडटोपी न दिल्याने एका कैद्याने दुसऱ्या कैद्याची हत्या केल्याची घटना नाशिक जेलमध्ये घडली आहे.

सचिन चावरे या कैद्याने तानाजी माने या कैद्याला माकडटोपी न दिल्याने, तानाजीला वीट मारून फेकली, वीटचा घाव वर्मी लागल्याने तानाजीचा मृत्यू झाला. मृत्यू झालेला तानाजी माने याचं वय ७० वर्ष होतं.

तानाजी माने हा जन्मठेपेची शिक्षा भोगत होता, तर चावरे हा 5 महिन्याची शिक्षा भोगत होता. नाशिक रोड पोलिस स्टेशनमध्ये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिकरोड जेलमध्ये ही घटना घडली. जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असताना मानेचा मृत्यू झाला.