www.24taas.com , झी मीडिया, मुंबई
मुंबईवरील 26-11च्या हल्ल्याच्या वेळी हॉटेल ताजमध्ये दहशतवाद्यांशी लढणारे तत्कालीन उपायुक्त विश्वास नांगरे-पाटील यांना राष्ट्रपतींचं शौर्यपदक मिळालंय. तर विविध कारवायांमध्ये सहभागी होऊन प्राणांची बाजी लावणाऱ्या २० पोलीस अधिकाऱ्यांचा आणि कर्मचाऱ्यांचा काल शौर्यपदक देऊन सन्मान करण्यात आला.
तर उल्लेखनीय सेवेबद्दल विशेष पोलीस महानिरीक्षक बी. के. उपाध्याय, राजेंद्र सिंह यांच्यासह चौघांना, तर गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल चाळीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गौरविण्यात आलंय. राज्यातल्या एकूण ६५ अधिकाऱ्यांना यंदा राष्ट्रपतींच्या हस्ते पदक बहाल झालंय. काल स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पोलीस दलात अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्या अधिकाऱ्यांचा आणि कर्मचाऱ्यांचा गौरव केला गेला.
विश्वास नांगरे पाटील यांच्यासह रवींद्र नुल्ले, अब्दुल गनी शेख, भीमदेव राठोड, संजय मारुती मोरे, संजय माणिकराव भापकर, विशाल हिरालाल ठाकूर, कैलास जयवंत टोकले, अंकुश माने, दिनकर कोमटी तिम्मा, श्यासमनदास उके, रामा कुडयामी, प्रभुदास डुग्गा, वसंत खाटेले, प्रशांत कांबळे, दीपक ढोले, नितीन काकडे, अमित खेतले, अरुण माने, अशोक पवार, सौदागर शिंदे या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही शौर्यपदकानं सन्मानित करण्यात आलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.