जळगाव : अमळनेरचे 'डीवायएसपी' रमेश पवार यांच्या नेतृत्वात पोलिसांकडून महिलेला अमानुष मारहाण केल्याचा एक व्हिडीओ झी मीडियाच्या हाती लागला आहे. या व्हिडीओ रमेश पवार यांच्यासोबत पुरूष पोलिस कॉन्स्टेबल्स दिसत आहेत, ते घरातून उमेदवार श्यामकांत पाटील यांना बाहेर काढताना दिसत आहेत. याचवेळी त्यांच्या लाठ्याकाठ्यांमध्ये महिला जखमी झाल्याचंही दिसतंय. एका महिलेच्या डोक्यातून रक्त वाहताना दिसतंय.
जखमी झालेल्या महिलात सीमा प्रशांत पाटील वहिणी, छायाबाई जयवंतराव आई, जयमाला सुनील पाटील यांना डोक्यात लाठ्या पडल्याने ३ महिला जबर जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारार्थ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या झटापटीत विलास एकनाथ गायकवाड हे देखील जखमी झाले आहेत.
महिलांना अमानुष मारहाण ही डीवायएसपी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असल्याचं या व्हिडीओत प्रथमदर्शनी दिसून येत आहे. डीवायएसपी या व्हिडीओ पुन्हा पुन्हा आरोपींच्या घराकडे येऊन, मारहाण झालीच नाही अशा प्रकारे निघून जाण्याच्या प्रयत्नात दिसून येत आहेत.
अमळनेर शहरात नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात झालेल्या राड्यात पोलिसांनी अरेरावीची भूमिका सुरूच ठेवली आहे. अमळनेरचे डीवायएसपींकडे मागील काही दिवसांपासून तक्रारी असतानाही त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही, यामुळे ही परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली असल्याचा आरोप अमळनेरच्या नागरिकांना केला आहे.
मात्र शहरातील तणाव वाढला आणि एसपी दाखल झाल्यानंतर रमेश पवार यांनी आरोपींची धरपकड करण्यासाठी नको ती पद्धत अवलंबली आहे.
शहरातील तलाठी कॉलनीत शहर विकास आघाडीचे उमेदवार शाम जयवंतराव पाटील यांना सकाळी ११ वाजता पोलीस अटक करण्यासाठी गेले. त्यावेळी झालेल्या बाचाबाचीत ३ महिलांसह १ पोलीस जखमी झाल्याची घटना घडली आहे. यात उमेदवार स्वतः उमेदवार घनश्याम पाटील हे जखमी झाले आहेत.