पेट्रोलपंप धारकांचा नियोजित संप तूर्तास मागे

राज्यभरातील पेट्रोल पंप चालक 14 आणि 15 मेपासून आंदोलन करणार होते. मात्र, तुर्तास हे आंदोलन स्थगित करण्यात आल्याची घोषणा फामपेडाचे अध्यक्ष उदय लोध यांनी केली आहे. शासनाने पंप चालकांवर मेस्मा अंतर्गत करवाई करण्याचा निर्णय घेतल्यामुळेच फामपेडाने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं. तसंच शासनाच्या मेस्मा लावण्याच्या निर्णयामुले पंपचालक मात्र चांगलेच नाराज झाले आहेत.

Updated: May 13, 2017, 04:57 PM IST
पेट्रोलपंप धारकांचा नियोजित संप तूर्तास मागे title=

मुंबई : राज्यभरातील पेट्रोल पंप चालक 14 आणि 15 मेपासून आंदोलन करणार होते. मात्र, तुर्तास हे आंदोलन स्थगित करण्यात आल्याची घोषणा फामपेडाचे अध्यक्ष उदय लोध यांनी केली आहे. शासनाने पंप चालकांवर मेस्मा अंतर्गत करवाई करण्याचा निर्णय घेतल्यामुळेच फामपेडाने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं. तसंच शासनाच्या मेस्मा लावण्याच्या निर्णयामुले पंपचालक मात्र चांगलेच नाराज झाले आहेत.

सरकार पंप चालकांवर दडपशाही करत असल्याचा आरोप देखील फामपेडाने केला आहे. त्यामुळेच रविवारीपासून करण्यात येणारं आंदोलन तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याचं फामपेडाचे अध्यक्ष उदय लोध यांनी जाहीर केला आहे. त्यामुळे आता राज्यभरातील सर्व पंप दिवसभर सुरू राहणार असून रविवारी देखील पंप सुरू ठेवण्यात येणार आहेत.

तेल कंपन्या आणि पंपचालक यांच्यात कमीशनच्या मुद्द्यावरून वाद होता आणि त्यामुळेच पंप चालकांना खर्च परवडत नव्हते त्यामुळे खर्च कमी करण्याचा निर्णय़ पंप चालकांनी घेतला आणि एकाच शिफ्टमध्ये पंप सुरू ठेवण्याचा आणि आठवड्याच्या रविवारी पंप पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता मात्र मेस्मा अंतर्गत कारवाई करणार असं सरकारने जाहीर केल्यामुळे पंप चालकांनी आपलं आंदोलन तूर्तास तरी स्थगित केलंय तसेच तेल कंपन्यानी 17 मे रोजी फामपेडाला चर्चेसाठी बोलावलं असून त्यानंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाईल अशी माहिती फामपेडाचे अध्यक्ष उदय लोध यांनी दिली आहे.