एका दिवसात राज्यात करोडोंचा मालमत्ता कर जमा...

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काळ्या पैशावर केलेल्या सर्जिकल हल्ल्याचा सकारात्मक परिणाम पहिल्या दोन तीन दिवसातच दिसायला सुरूवात झालीय.

Updated: Nov 11, 2016, 09:35 AM IST
एका दिवसात राज्यात करोडोंचा मालमत्ता कर जमा...  title=

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काळ्या पैशावर केलेल्या सर्जिकल हल्ल्याचा सकारात्मक परिणाम पहिल्या दोन तीन दिवसातच दिसायला सुरूवात झालीय.

राज्यातल्या नगरपालिका आणि महापालिकांमध्ये थकलेला मालमत्ता कर भरून पाचशे आणि हजाराच्या नोटा खपवण्यासाठी एकच गर्दी उसळलीय. काल संध्याकाळी कर भरायला आलेल्यांकडून पाचशे आणि हजाराच्या नोटा स्वीकारण्याचा आदेश राज्य सरकारनं दिले. तेव्हापासून पालिकांमध्ये कर भरण्यासाठी एकच झुंबड उडलीय. 

करोडोंचा कर जमा... 

पहिल्या दोन तासांत कल्याण डोंबिवली महापालिकेत तब्बल २ कोटी रुपये मालमत्ता कर जमा झाला तर उल्हास नगरपालिकेच्या तिजोरीत एक कोटी तीन लाखांची भर पडली. 

इकडे वसई विरारमध्ये ४३ लाखांचा महसूल गोळा झाला. तर धुळ्यात १३ लाख, तर जळगाव महापालिकेतही १६ लाखांचा महसूल गोळा झाला. जालना नगरपालिकेतही करवसुलीचे सगळे रेकॉर्ड मोडले जाण्याची शक्यता आहे. 

उल्लेखनीय म्हणजे, आज मध्यरात्रीपर्यंत कर भरण्यासाठी ५०० आणि १००० च्या जुन्या नोटा स्वीकारण्यात येणार आहे. 

त्यामुळे केंद्राच्या निर्णयामुळे वर्षानुवर्ष थकललेल्या करांचा भरणा झाल्यानं पालिका मालामाल होताना दिसत आहेत.