महाराष्ट्रात आज परभणीत सर्वात कमी तापमान

 उत्तर महाराष्ट्र गारठलेला असताना आता  विदर्भ आणि मराठवाड्यालाही चांगलीच हुडहुडी भरलीय...आज परभणीचं तापमान अवघ्या 4 अंशांपर्यंत खाली आलंय. गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडका आहेच..त्यात आज आणखी भर पडलीय...

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 13, 2017, 09:55 PM IST
 महाराष्ट्रात आज परभणीत सर्वात कमी तापमान  title=

मुंबई :  उत्तर महाराष्ट्र गारठलेला असताना आता  विदर्भ आणि मराठवाड्यालाही चांगलीच हुडहुडी भरलीय...आज परभणीचं तापमान अवघ्या 4 अंशांपर्यंत खाली आलंय. गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडका आहेच..त्यात आज आणखी भर पडलीय...

 तिकडे धुळे जिल्ह्याच्या इतिहासात सर्वाधिक थंडीचा सामना नागरिकांना या वर्षी करावा लागतोय. गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्याचं तापमान पाच अंश सेल्सियस खाली आहे. तर शुक्रवारी धुळ्याचं तापमान ४.४ अंश सेल्सियस नोंदवलं गेलं. 

 
 गेल्या काही दिवसापासून कमी झालेल्या थंडीचा जोर आता वाढला असून नागपूरसह संपूर्ण विदर्भात पारा घसरला आहे.. नागपुरात आज ७. १ डिग्री सेल्सियस एवढ्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली. नागपूरचे आजचे तापमान या मोसमातील सर्वात कमी तापमान ठरले. 
 
 उत्तर भारतात झालेल्या हिमवृष्टीमुळे सध्या विदर्भातही थंडीची लाट पसरली आहे... विदर्भात बहुतांश ठिकाणी तापमान सरासरीपेक्षा ५ ते ६ डिग्री अंश सेल्सियस ने घट झाली आहे.. गेल्या आठवड्यात १३ अंश सेल्सियस वर पोहचलेले नागपूरचे किमान तापमान आज ७.२ अंश सेल्सियस वर पोहचले आहे.. 

विदर्भात सर्वात कमी तापमानाची नोंद गोंदिया जिल्ह्यात करण्यात आली.. येथील तापमान ६.५ अंश सेल्सियस एवढे राहिले तर सर्वाधिक तापमान चंद्रपूर येथे १०.० अंश सेल्सियस एवढे राहिले... वाऱ्यामुळे थंडी जास्त जाणवत असून येत्या २-३  दिवसात परिस्थिती बदलण्याचा अंदाज नागपूर वेधशाळेने वर्तवला आहे. 

उत्तरेकडून येणारी थंडीची लाट ही विदर्भावर काही काळाकरिता कायम राहणार आहे.. त्यामुळे पुढील काही दिवस थंडी नागरिकांना हैराण करेल हे नक्की.