पनवेल : चड्डी बनियान गॅंग सीसीटीव्हीत कैद

नवी मुंबईतल्या पनवेलच्या साईनगरमधला बंद बंगला लुटण्यासाठी आलेले चड्डी बनियान दरोडेखोर सीसीटीव्हीमध्ये कैद झालेत.

Updated: May 27, 2015, 04:48 PM IST
पनवेल : चड्डी बनियान गॅंग सीसीटीव्हीत कैद title=

नवी मुंबई : नवी मुंबईतल्या पनवेलच्या साईनगरमधला बंद बंगला लुटण्यासाठी आलेले चड्डी बनियान दरोडेखोर सीसीटीव्हीमध्ये कैद झालेत.

माजी नगरसेवक श्रीकांत ठाकूर यांचा पनवेलच्या साईनगरमध्ये उपवन बंगला आहे. मात्र तो बंद असतो. हा बंगला लुटण्यासाठी दरोडेखोर आले होते. त्यांनी बंगल्याची दारं तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी परिसरात सीसीटीव्ही असल्याचं समजताच या चोरट्यानी पळ काढला.

त्यानंतर चोरट्यांनी शेजारच्या दोन घरात जाऊन घरफोडी केली. चोरट्यांनी साडेचार तोळे सोनं आणि १७ हजार रोकड लंपास केलीय. हे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे दिले असून पोलीस अधिक तपास करतायत.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.