लातूर : लातूरमध्ये सुमारे दोनशेहून अधिक शाळकरी विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे.
लातूर शहराजवळच्या सीआरपीएफ केंद्रानजिक समाजकल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहातल्या विद्यार्थ्यांना रविवारी जेवणातून विषबाधा झाली. त्यामुळे २२५ विद्यार्थ्यांना शासकीय सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
दुपारचं जेवण जेवल्यानंतर मळमळणं, चक्कर येणं, जुलाब-उलट्याचा त्रास या विद्यार्थ्यांना होऊ लागला होता. समाजकल्याण विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळेच हा प्रकार घडल्याचं बोललं जात आहे. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती सुखरूप असल्याचे डॉक्टरांनी सांगितलंय.
Maharashtra: Over 200 students' of a government hostel in Latur fall sick after allegedly consuming meal in the hostel (4.12.16) pic.twitter.com/rgjTK9HUDE
— ANI (@ANI_news) December 5, 2016