बनावट नोटा छापण्याप्रकरणी आणखी एकाला अटक

राष्ट्रवादी कॉंग्रेसचा माजी पदाधिकारी छबू नागरेसह बनावट नोटा छापणारी अकरा जणांची टोळी जेरबंद केल्यानंतर तब्बल 12 दिवसांनी नाशिक पोलिसांना छबू नागरेचा आणखी एक साथीदार पकडण्यात यश आलंय. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 2, 2017, 07:42 PM IST
बनावट नोटा छापण्याप्रकरणी आणखी एकाला अटक  title=

नाशिक : राष्ट्रवादी कॉंग्रेसचा माजी पदाधिकारी छबू नागरेसह बनावट नोटा छापणारी अकरा जणांची टोळी जेरबंद केल्यानंतर तब्बल 12 दिवसांनी नाशिक पोलिसांना छबू नागरेचा आणखी एक साथीदार पकडण्यात यश आलंय. 

कृष्णा अग्रवाल असं त्याचं नाव असून तो संगणकतज्ज्ञ असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. छबुच्या सांगण्यावरून  स्कँनर प्रिंटरच्या माध्यमातून कृष्णाच बनावट नोटा छापत असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालाय. 

छबू नागरे, रामराव पाटील, संदीप सस्ते आणि आज पोलिसांना शरण झालेल्या कृष्णा अग्रवाल यांना 1 दिवसाची पोलिस कोठड़ी सुनावण्यात आलीय. तर इतर 8 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय. 

या प्रकरणात आणखी तपास होणे बाकी असल्याने सर्व आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी पोलिसांनी केली होती. २३ डिसेंबरच्या रात्री आयकर विभाग आणि नाशिक पोलिसांच्या टीमने या टोळीचा पर्दाफाश केला होता,