सांगली : मिरजमध्ये रेल्वे युनियनच्या निवडणुकीच्या वादातून एकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. सोलोमन असं त्याचं नाव आहे. जमावानं त्याला लाथा बुक्यांनी मारहाम केलीय. मिरज रेल्वे जंक्शनजवळ शनिवारी संध्याकाळी सव्वा सातच्या सुमाराला ही घटना घडली आहे.
ही संपूर्ण मारहाण तिथल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालीय. सीआरएमएस आणि एनआरएमव्ही या संघटनेत रेल्वे युनियनची निवडणूक झाली. निकालानंतर जमावाकडून सोलोमनला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी गांधी चौकी पोलिसांनी मात्र हातवर केले आहेत.
सोलोमननही पोलिसांत तक्रार देण्यास नकार दिला आहे. ही अमानुष मारहाणीची घटना घडूनही पोलीस हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याची कुजबूज आता नागरिकांमध्ये सुरू आहे.