धक्कादायक: जमिनीवर आपटून वडिलांनी घेतला मुलाचा जीव

कंस मामानं आपल्या भाच्यांना आपटून मारलं हे आपण पुराणात ऐकलंय. मात्र एका सावत्र पित्यानं क्षुल्लक कारणावरून रागाच्या भरात तीन वर्षीय चिमुकल्याला जमिनीवर आपटून ठार केल्याची घटना अंबरनाथमधील फॉरेस्ट नाका परिसरात घडली. 

Updated: Sep 7, 2014, 08:25 AM IST
धक्कादायक: जमिनीवर आपटून वडिलांनी घेतला मुलाचा जीव title=

अंबरनाथ: कंस मामानं आपल्या भाच्यांना आपटून मारलं हे आपण पुराणात ऐकलंय. मात्र एका सावत्र पित्यानं क्षुल्लक कारणावरून रागाच्या भरात तीन वर्षीय चिमुकल्याला जमिनीवर आपटून ठार केल्याची घटना अंबरनाथमधील फॉरेस्ट नाका परिसरात घडली. 

अंबरनाथ पश्चिम इथं फॉरेस्ट नाका झोपडपट्टी परिसरात आरोपी नीरज प्रेमसागर तिवारी (३४) हा बायको यलम्मा तिवारी (२५) आणि तिच्या पहिल्या पतीचा तीन वर्षांचा मुलगा संतोष कोपचीकर यांच्यासोबत राहत होता. शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास संतोष रडू लागल्यानं नीरजनं त्याच्या कानाखाली मारली. यावर मुलाच्या आईनं चापट का मारली, असं विचारता आरोपी नीरजचा राग आणखी अनावर झाला आणि त्यानं रागाच्या भरात संतोषला जमिनीवर आपटलं. त्यामुळं त्याच्या डोक्याला गंभीर इजा होऊन जागीच मृत्यू झाला. 

संतापाच्या भरात नवऱ्यानं केलेल्या कृत्यानं आपला मुलगा मृत झाल्याचं कळताच आई यलम्मानं नीरजविरोधात पोलिसात हत्येची तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी नीरजला अटक केली. शनिवारी नीरजला पोलिसांनी कोर्टात हजर केलं होतं.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.