कुख्यात गुंड मेहबूब पठाणला अटक

परभणीतला कुख्यात गुंड मेहबूब पठाणला पोलिसांनी अटक केली. परभणीतील रहात्या घरातून त्याला अटक करण्यात आली आहे.

Updated: Nov 28, 2015, 07:41 PM IST
कुख्यात गुंड मेहबूब पठाणला अटक title=

परभणी : परभणीतला कुख्यात गुंड मेहबूब पठाणला पोलिसांनी अटक केली. परभणीतील रहात्या घरातून त्याला अटक करण्यात आली आहे.

२००३ मध्ये परभणीत झालेल्या विद्या देशमुख हत्या प्रकरणात पठाण प्रमुख आरोपी आहे. या प्रकरणी तो नागपूर कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. मात्र आजापणाचे नाटक करुन तो शासकीय वैद्यकीय रुग्णालयात भरती झाला आणि तिथून तो पळाला होता.

मागील दोन महिन्यांपासून पोलीस त्याच्या मागावर होते. अखेर पोलिसांनी त्याला जेरबंद केलं. पठाणवर खून आणि बलात्कारासारखे गंभीर आरोप आहेत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.