उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, दोन बळी

मान्सूनमध्ये पाठ फिरवलेल्या पावसाने जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार हजेरी लावलीय. तर जालना आणि धुळे जिल्ह्यात गेल्या २४ तासात पावसानं जोरदार हजेरी लावलीय. अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेय. तर जळगावात दोघांचा मृत्यू झाला.   

Updated: Sep 9, 2014, 08:53 AM IST
उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, दोन बळी title=

जळगाव : मान्सूनमध्ये पाठ फिरवलेल्या पावसाने जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार हजेरी लावलीय. तर जालना आणि धुळे जिल्ह्यात गेल्या २४ तासात पावसानं जोरदार हजेरी लावलीय. अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेय. तर जळगावात दोघांचा मृत्यू झाला.   

या पावसामुळे जळगाव जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झालीय, जळगाव तालुक्यातल्या य चार जण बैलगाडीसह नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून गेलेत, यापैकी दोघांचा मृत्यू झालाय.  हतनूर धरणाचा धोका जलफुगवट्यातील गावांना बसू नये यासाठी धरणाचे सर्वच्या सर्व ४१ दरवाजे उघडण्यात आलेय, त्यातून तापी नदीपात्रात २ लाख १३ हजार २१३ क्युसेस पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलाय. जळगाव शहरातल्या  रहिवासी भागात घुसल्यानं नागरिकांची चांगलीच तारंबळ उडाली होती.

धुळे जिल्ह्यात गेल्या २४ तासात पावसानं जोरदार हजेरी लावलीय.  जिल्ह्यात शिरपूर तालुक्यात सर्वाधिक  ११७ मिलीमीटर पाऊसाची नोंद झाली आहे.  या पावसामुळे जिल्ह्यातल्या नद्यांना पूर आलाय,. प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय.  

भीमा नदीच्या खो-यात  पाऊसाने जोरदार हजेरी लावल्यानं उजनी धरण 100 टक्के भरलंय. उजनीतून मोठा विसर्ग चंद्रभागा नदीत सोडल्यानं नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. पंढरपुरातले पुंडलिकाचे मंदीर हे पाण्यात गेलंय. सोलापूर जिह्यातील अनेकांनी उजनी धरणाच्या पाण्याची ओटी भरून पूजा केलीय. 

जालना जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसानं हजेरी लावलीय. जिल्ह्यातल्या अनेक धरणं ओव्हरफ्लो झालीत. पूर्णा नदीला पावसामुळे पूर आला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. या पावसामुळे शेतमालाच्या किमतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. 

तर दुसरीकडे कोकणातही पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. संगमेश्वर, रत्नागिरी, चिपळूणला जोरदार पावसाने तडाखा दिला. संगमेश्वर, चिपळूण, खेडमध्ये नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली होती. त्यामुळे नदी काठच्या भागात धोक्याचा इशारा देण्यात आला होता.

 इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.