पुणे : राज्यात अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली असून आगामी 6 - 7 दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे.
मुंबई, कोकण आणि मध्य महाराष्ट्रसह इतर ठिकाणी हा पाऊस होणार आहे. राज्यात अनेक ठिकानी सुरुवातीच्या काळात पावसाने ओढ दिली होती.
मात्र, ही कमतरता पावसाने आता भरुन काढली आहे. सध्या पडत असलेल्या पावसचा फायदा खऱीप पिकाला होणार आहे.
हा पाऊस असाच पुढे थोडा फार अंतराने पडत राहणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे.