महापौरपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार? सोनावणेंचं नाव आघाडीवर

नवी मुंबई महापालिकेच्या निवडणूकीत यश संपादन केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसला वेध लागलेत ते महापौर पदाच्या निवडणूकीचे. या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वात जास्त जागा मिळाल्यानं त्यांचाच महापौर बसणार हे जवळ जवळ निश्चित झालंय. मात्र राष्ट्रवादीतही महापौर पदासाठी अनेक दावेदार असल्यानं गणेश नाईक नेमकं कोणाच्या गळ्यात महापौर पदाची माळ घालतात याची उत्सूकता शिगेला पोहचलीय.

Updated: Apr 26, 2015, 12:54 PM IST
महापौरपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार? सोनावणेंचं नाव आघाडीवर title=

नवी मुंबई: नवी मुंबई महापालिकेच्या निवडणूकीत यश संपादन केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसला वेध लागलेत ते महापौर पदाच्या निवडणूकीचे. या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वात जास्त जागा मिळाल्यानं त्यांचाच महापौर बसणार हे जवळ जवळ निश्चित झालंय. मात्र राष्ट्रवादीतही महापौर पदासाठी अनेक दावेदार असल्यानं गणेश नाईक नेमकं कोणाच्या गळ्यात महापौर पदाची माळ घालतात याची उत्सूकता शिगेला पोहचलीय.

महापौर पद हे अनूसुचित जाती या आरक्षित प्रवर्गासाठी राखीव झाल्यानं आता राष्ट्रवादीला त्याच प्रवर्गाचा उमेदवार महापौर पदासाठी निवडावा लागणार आहे. त्यामुळे या वर्गात सांगलीच स्पर्धा सुरु झालीय. मात्र त्यात सर्वात जास्त आघाडीवर नाव आहे ते आरपीआयचे नेते आणि गणेश नाईकांचे सगळ्यात जवळचे उमेदवार सुधाकर सोनावणे आणि त्यांच्या पत्नि रंजना सोनावणे या दाम्पत्याचं.

सुधाकर सोनावणे यांचं कुटूंब सलग तीन वेळा महापालिकेच्या निवडणूकीत जिंकून महापालिकेत गेलेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.