नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका निवडणुकीत नाईक घराणे एकमेकांसमोर उभं ठाकलं आहे. प्रभाग क्रमांक 51 मधून भाजपचे युवा नेते वैभव नाईक यांच्या पत्नी वैष्णवी नाईक यांच्यासमोर राष्ट्रवादीने त्यांची नणंद वैशाली नाईक यांना उमेदवारी दिलीय. नणंद भावजयांची ही लढत रंगतदार होणार आहे.
नवी मुंबईत आत्तापर्यंत नाईक घराण्याने एकहाती सत्ता उपभोगलीय. मात्र, यावेळी घराण्यातलं कोणीही लढणार नाही असं गणेश नाईक यांनी जाहीर करूनही त्यांचे लहान बंधू तुकाराम नाईक यांच्या कन्येनं राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणुकीत उडी घेतलीय. प्रभाग क्रमांक 51 मधून वैशाली नाईक यांनी उमेदवारी अर्ज भरला.
तुकाराम नाईक यांचा मुलगा वैभव नाईक आता भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यांच्या पत्नी वैष्णवी नाईक यांनीही याच प्रभागातून भाजपतर्फे उमेदवारी दाखल केलीय.
गणेश नाईक यांचे चुलतभाऊ लीलाधर नाईक यांनीही प्रभाग क्रमांक 50 मधून अर्ज दाखल केलाय. माजी महापौर सागर नाईक निवडणुकीच्या रिंगणात नाहीत. मात्र, कोपरखैरण्यातून होत असलेली ही नणंद भावजयीची लढत रंगत आणणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.