राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडेंची बंडखोरी

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विलास लांडे यांनी बंडखोरी केली आहे. पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या जागेसाठी विलास लांडेंनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरलाय. 

Updated: Nov 3, 2016, 07:36 AM IST
 राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडेंची बंडखोरी title=

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विलास लांडे यांनी बंडखोरी केली आहे. पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या जागेसाठी विलास लांडेंनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरलाय. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अनिल भोसले यांना त्यांनी आव्हान दिलं आहे. राष्ट्रवादीतल्या या बंडामुळं पुणे विधान परिषदेची ही निवडणूक रंगतदार ठरणार आहे.