काय आहे राष्ट्रवादीच्या पिंपरीच्या जाहिरनाम्यात...

 राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा अजित पवार यांच्या हस्ते आज प्रकाशित करण्यात आला. ...! 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Feb 15, 2017, 07:04 PM IST
 काय आहे राष्ट्रवादीच्या पिंपरीच्या जाहिरनाम्यात... title=

पिंपरी चिंचवड :  राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा अजित पवार यांच्या हस्ते आज प्रकाशित करण्यात आला. ...! 

पाहा काय आहे या जाहीरनाम्यात आश्वासनांची खैरात

                        
- देहू आळंदी चा पिंपरी चिंचवड मध्ये समावेश करणार                        
- जगतगुरु संत तुकाराम महाराज संतपीठ उभारणार                        
 - शहर हॉर्नमुक्त करणार                        
- हिंजवडी आणि गहुंजे सह सात गावांचा शहरात समावेश करणार                        
- रस्ते विकासा साठी प्रयत्न करणार                        
- झोपडपट्ट्यांमध्ये मोफत वाय फाय देणार                        
- महापालिकेच्या सर्व शाळा इ लर्निंग सुविधा देणारॉ
- शहराची पाण्याची गरज लक्षात घेऊन आन्द्र आणि भामा आसखेड प्रकल्पातून पाणी आणणार                        
- शहराला 24 तास पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन                        
- नागरिकांच्या सोयीसाठी स्पॉट बिलिंग ची सोय करण्याचे आश्वासन                        
- मावळ मधून बंद पाणीपुरवठा योजना सुरु करण्यासंबंधी मागणी करणार                        
- सांडपाण्यावर 100 टक्के प्रक्रिया करणार                        
- औद्योगिक सांडपाण्यामूळ होणारे नदीचे प्रदूषण टाळण्यासाठी सी इ पी टी प्रकल्प सुरू करण्यासाठी पाठपुरावा करणार
- शहर कचरा कुंडी मुक्त करणार आणि कंटेनारमुक्त करण्याच उद्दिष्ट, नवीन कचरा डेपो सुरु करण्यासाठी जागा ताब्यात घेणार
- शहर स्वछ करण्यासाठी चकाचक पिंपरी चिंचवड स्पर्धा घेऊन नागरिकांचा सहभाग वाढवून प्रयत्न करणार
- शहरातील सर्व चौक सिग्नल विरहित करणार                        
- शहरातील 45 मीटर पेक्षा मोठे रस्ते सिमेंट काँक्रीटीकरण करणार
- बोपखेल चा मिलिटरी हद्दीतला रोड बंद झाल्यामुळं या परिसरातल्या 30 हजार - लोकांचा प्रश्न कायमस्वरूपी मिटा वा या साठी बोपखेल खडकी रास्ता विकसित करणार, त्यासाठी 50 कोटी रुपयांचा पूल उभारणार
- राष्ट्रवादी जाहीरनामा - गरिबांसाठी पंतप्रधान आवास योजने अंतर्गत 6530 घरे बांधणार                        
- अनधिकृत बांधकाम नियमित करण्यासाठी आणि शास्ती कर रद्द करण्यासाठी प्रयत्न करणार असा दावा
- झोपडपट्टीतल्या युवकांसाठी व्यवसाय मार्गदर्शन केंद्र सुरू करणार                        
- अजित पवार प्रेस कॉन्फरन्स सुरु                        
- भाजप कडून शपथ घेण्याचा कार्यक्रम नौटंकी