पुणे : शहरातील सॉफ्टवेअर इंजिनिअर नयना पुजारी सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा निकाल ८ मे रोजी लागण्याची शक्यता आहे.
गेल्या ८ वर्षांपासून पुण्यातल्या विशेष नायायालयात या प्रकारणाची सुनावणी सुरु आहे. या प्रकरणात योगेश राऊत, विश्वास कदम आणि महेश ठाकूर हे आरोपी असून, चौथा आरोपी राजेश चौधरी माफीचा साक्षीदार आहे. या चौघांनी ८ ऑक्टोबर २००९ रोजी ३२ वर्षीय नयना पुजारीचं अपहरण केले होते.
नयना खराडीतल्या सिनेक्रोन कंपनीत काम करत होती. संध्याकाळी ती ऑफिसातून निघाल्यानंतर या चौघांनी तिला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने गाडीत बसवले आणि तिला वाघोली परिसरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला होता. त्यानंतर त्यांनी तिचा निर्घृण खूनही केला. या घटल्यात तब्बल ५० साक्षीदार तपासण्यात आले.