दोन पुरोहितांकडे अडीच कोटीपेक्षा जास्त मालमत्ता

या नगरीतील दोन पुरोहितांवर आयकर विभागाने छापे घातले, 48 तास सुरु असलेल्या चौकशीत अडीच कोटींची बेहिशेबी रक्कम आणि काही किलो सोने आढळले. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 29, 2016, 08:40 PM IST
दोन पुरोहितांकडे अडीच कोटीपेक्षा जास्त मालमत्ता title=

नाशिक : आयकर विभागाने धाडी टाकल्यानं आद्य ज्योतिर्लिंग असलेल्या त्र्यंबक नगरीत मोठी खळबळ उडाली आहे. देशभरातून भाविक श्रद्धेनं नाशिकमध्ये येत असतात. हीच प्रतिमा मलिन होऊ नये म्हणून पौरोहित्यही आता कॅशलेस होणार आहे.

त्र्यंबकेश्वर म्हणजे शिवनगरी, या नगरीतील दोन पुरोहितांवर आयकर विभागाने छापे घातले, 48 तास सुरु असलेल्या चौकशीत अडीच कोटींची बेहिशेबी रक्कम आणि काही किलो सोने आढळले. 

या पुरोहितांचे वेगवेगळे व्यवसायाशी असलेलले संबंध याला कारणीभूत ठरले यामुळे सर्व पुरोहितांची बादनामी होत असल्याने सर्व व्यवहार कॅशलेस करण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे.
 
या नगरीत नव्वद टक्के पुरोहित आयकर भरत असल्याचा दावा आता पुरोहित संघाकडून केला जातोय नाशिक शहरात तरुण असलेले अनिकेत शास्त्री यांनी याची सुरुवात कधीच केली आहे. सर्व पूजा विधी मध्ये येणारी रक्कम ही शुद्ध असावी असं त्यांचं मत आहे..

नाशिकमध्ये आता पुरोहितांच्या व्यवहारांचं शुद्धीकरण  होण्यास सुरुवात झाली आहे. मंत्र पुरोहितांच्या व्यवहारांचं शुद्धीकरण राज्यातच नव्हे तर देशभरातंही होणं गरजेचं आहे.