नाशिकचं इसिस कनेक्शन: गौरवचं अपहरण, धर्मांतर करून इसिसला रवानगी

 परदेशात नोकरीचं आमिष दाखवून तरुणाचं अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आलाय. नाशिकमधल्या कपडा बाजार परिसत राहणाऱ्या गौरव संधानशिव या तरुणाचं धर्मांतर करुन अपहरण करण्यात आल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केलाय. पोलिसांनी सिराज शेख या आरोपीविरोधात अपहरणाचा गुन्हा नोंदवलाय. मात्र यानिमित्तानं नाशिकमध्ये इसिसचं कनेक्शनचा संशय  व्यक्त होतोय. 

Updated: Sep 9, 2015, 10:42 AM IST
नाशिकचं इसिस कनेक्शन: गौरवचं अपहरण, धर्मांतर करून इसिसला रवानगी title=

नाशिक, योगेश खरे, झी  मीडिया:  परदेशात नोकरीचं आमिष दाखवून तरुणाचं अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आलाय. नाशिकमधल्या कपडा बाजार परिसत राहणाऱ्या गौरव संधानशिव या तरुणाचं धर्मांतर करुन अपहरण करण्यात आल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केलाय. पोलिसांनी सिराज शेख या आरोपीविरोधात अपहरणाचा गुन्हा नोंदवलाय. मात्र यानिमित्तानं नाशिकमध्ये इसिसचं कनेक्शनचा संशय  व्यक्त होतोय. 

नाशिकचं इसिस कनेक्शन

नाशिकच्या कपडा बाजारातील वाड्यात राहणार हे संदानशिव कुटुंब सध्या चिंताग्रस्त आहे. त्यांचा मुलगा गौरव हा एमबीए करून मुंबईत रिलायंस आणि फ्युचर कंपनीत नोकरी करत होता. त्याला कुवेतच्या एका कंपनीची ऑफर आली. लवकरच परदेशात नवीन नोकरी मिळणार यासाठी तो नाशिकला घरी आला. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला फोन आला आणि गौरव गेला तो अजूनही परत आलेला नाही. घरातील गौरवच्या साहित्याचा तपास केला असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. त्याच्या बॅगेत कुवेतच्या कंपनीचं ऑफर लेटर आणि बँकेत ५४ हजार रुपये कंपनीनं जमा केल्याचं पुढं आलंय. तसंच मुस्लिम धर्माशी संबंधित काही वस्तूही त्याच्या बॅगेत आढळल्या आहेत. त्यामुळं धर्मांतर करुन अपहरण करण्यात आल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केलाय. 

पोलिसांनी या प्रकरणाची तातडीनं दखल घेऊन अपहरणाचा गुन्हा नोंदवलाय. गौरवला शोधण्यासाठी दोन पथकं रवाना झाली असून लकरच या प्रकरणाचा उलगडा करण्याचा विश्वास पोलिसांनी व्यक्त केलाय. 

इसिससारख्या दहशतवादी संघटनांनी तरुणांना अरब राष्ट्रांमध्ये नोकरी देण्याचं आमिष दाखवून आकर्षित केल्याच्या घटना यापूर्वीच समोर आल्या आहेत. मात्र आता हे कनेक्शन नाशिकपर्यंतही पोहचलंय की काय? असा गंभीर प्रश्न गौरवच्या अपहणाच्या निमित्तानं निर्माण झालाय.  

तरुणांनो सावध राहा
 
दरम्यान, परदेशी नोकरीसाठी जाणाऱ्या युवकांनी आणि त्यांच्या पालकांनी सावध राहावं असा सल्ला नाशिक गुन्हे शाखेचे पोलीस सहआयुक्त सचिन गोरे यांनी दिला आहे.  

आणखी वाचा - आंतरराष्ट्रीय दहा बातम्या एका क्लिकवर

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.