नाफेड २ दिवसात हमी भावाने तूर खरेदी करणार

तुरीची सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एक असलेल्या लातूरच्या बाजारपेठेत तुरीची आवक वाढली आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 14, 2017, 04:15 PM IST
नाफेड २ दिवसात हमी भावाने तूर खरेदी करणार title=

लातूर : तुरीची सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एक असलेल्या लातूरच्या बाजारपेठेत तुरीची आवक वाढली आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून लातूरमध्ये नाफेडतर्फे तूर खरेदी बंद करण्यात आली होती. 

मात्र आता नाफेड आणि लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीने तूर ठेवण्यासाठी पर्यायी गोदामांची व्यवस्था केली आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसात नाफेड हमी भावाने तूर खरेदी सुरू करणार आहे. 

दरम्यान हमीभावापेक्षा कमी भावाने तूर विक्री करणा-याविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा बाजार समितीने दिलाय.