पुणे : मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवरील टोलवसुली संपत आल्यामुळे आता पुन्हा एकदा एक्स्प्रेस वेच्या आठ पदरीकरणाचा आणि एलिव्हेटेड रस्त्याचा घाट सरकार घालत आहे, असा आरोप सजग नागरिक मंचाने केला आहे.
मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवरील टोल वसुलीतून 2869 कोटींचे उत्पन्न अपेक्षित होतं. त्यापैकी 2812 कोटी वसूल झाले आहेत. तर 700 कोटी रूपये अडीच वर्षांपूर्वीच अदा करण्यात आले आहेत, असं असताना लोणावळा- कुसगाव- खोपोली एक्झिट हा टप्पा आठ पदरी करण्याचा जीआर काढण्यात आला आहे.
तसेच खालापूर फूडमॉल ते खोपोली एक्स्चेंजपर्यंतचा रस्ता एलिव्हेटेड बांधला जाणार आहे. त्यामुळे रूंदीकरणासोबतच सध्या सुरू असलेली टोलवसुली तातडीने बंद करावी, अशी मागणी सजग नागरिक मंचाने केली आहे.