ठाणे : ताणतणावातून मुक्त आणि शारीरिक तंदरूस्तीसाठी ठाणे पोलीस आयुक्तालय, थँक्स इंडिया आणि वेदांत हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबिय़ांसाठी मॅरेथॉनचं आयोजन रविवारी करण्यात आलं होतं. आज पहाटेच या मॅरेथॉनला हिरवा कंदील दाखवण्यात आला.
विशेष म्हणजे या स्पर्धेत पोलीस धावले आणि संस्थेचे सदस्य बंदोबस्तावर थांबले. हिरानंदानी इस्टेट इथून या स्पर्धेला सुरूवात झाली. स्पर्धेच्या मार्गिकेत 24 ठिकाणी, पाणी, ग्लुकोज स्टॉल लावण्यात आले आहेत. 400 स्पर्धकांनी यात नोंदणी केली. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी या स्पर्धेला हिरवा कंदील दाखवला.