पणजी : मुंबई गोवा या राष्ट्रीय महामार्गाचे कामही हाती घेण्यात येणार आहे . एकूण २२ फेजमधील या कामांपैकी १८ ची कामे सुरु आहेत . या मार्गात २२ उडडाण पूल उभारण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
मुंबई गोवा महामार्गाला जोडणाऱ्या देवास - करंजा या सागरी ब्रिजचे कामही लवकरच हाती घेण्यात येणार आहे, अशी माहिती नितीन गडकरी यांनी यावेळी दिली.
गोवा आणि गोवा मेंगलोर या राष्ट्रीय महामार्गाचे सर्व साधनसुविधांसह चौपदरीकरण करण्यात येत आहे. यातल्या राष्ट्रीय महामार्ग १७ मधील पत्रादेवी ते पणजी आणि पणजी ते बांबोळी या मार्गच्या चौपदरीकरणाच्या कामाचा शुभारंभ केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाला. त्यामुळे त्यांनी ही माहिती दिली.
यावेळी केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर गोव्याचे मुख्यमंत्री लक्षमिकांत पार्सेकर उपस्थित होते. अत्याधुनिक सुविधा असणारा हा महामार्ग बनविणायचे काम आता जोरात सुरु झाले आहे. २०१८ पर्यंत ते पूर्ण होईल.