MPSC विद्यार्थ्यांबद्दल संवेदनाशून्य!

एमपीएससीचा सर्व्हर दोन आठवड्यांपूर्वी क्रॅश झाला होता. परीक्षा चार दिवसांवर आली असताना पुन्हा एकदा सर्व्हर क्रॅश झाल्यामुळे अभ्यास सोडून परीक्षांचे फॉर्म्स पुन्हा भरावे लागणार आहेत.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 2, 2013, 08:54 PM IST

www.24taas.com, मुंबई
एमपीएससीचा सर्व्हर दोन आठवड्यांपूर्वी क्रॅश झाला होता. परीक्षा चार दिवसांवर आली असताना पुन्हा एकदा सर्व्हर क्रॅश झाल्यामुळे अभ्यास सोडून परीक्षांचे फॉर्म्स पुन्हा भरावे लागणार आहेत. यानंतर त्यांना हॉल तिकिट कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या गोंधळाबद्दल बोलताना माजी मनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी म्हणाले, “MPSC याबद्दल विद्यार्थ्यांना फॉर्म्स ४ एप्रिलपर्यंत पुन्हा भरण्याची सूचना देत आहे. यानंतर एका दिवसांत सर्वांना हॉल तिकिट देऊन सात एप्रिल रोजी परीक्षा घेणार असल्याचं MPSC चं म्हणणं आहे. मात्र ५ एप्रिलला एका दिवसात राज्यभरातील ५ लाख विद्यार्थ्यांना हॉल तिकिट देणं अशक्य आहे. यामुळे हजारो विद्यार्थ्यांनी संधी हुकणार आहे.”
“ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एसएमएस किंवा इमेल्सने जरी हॉल तिकिट पाठवणार असल्याचं सांगितलं, असलं तरी गावांमध्ये अनेक जणांकडे मोबाइल नसतो, तसंच दिवसभर लाइट्स नसतात. अजूनही विद्यार्थ्यांना त्यांची परीक्षा केंद्रं माहित नाहीत. तसंच त्यांच्याकडे रजिस्ट्रेशन आयडीदेखील नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या बाबतीत MPSC संवदनाशून्य असल्याचं दिसून येत आहे.” असंही अविनाश धर्माधिकारी म्हणाले.

एमपीएससी परीक्षेवर अभूतपूर्व संकट ओढवलय. एमपीएससीचा सर्व डेटा करप्ट झालाय. एमपीएससीचा सर्व्हरच क्रॅश झालाय. यामुळं विद्यार्थ्यांना पुन्हा फॉर्म भरावे लागणार आहेत. येत्या रविवारी ही परीक्षा होणार आहे. दोन दिवसांत सर्वांना पुन्हा फॉर्म भरणं अशक्य आहे. त्यामुळं परीक्षार्थींपुढे प्रश्न निर्माण झाला आहे.