खासदार राजू शेट्टींनी विकला भाजीपाला

शेट्टी स्वतः भाजीपाला विक्रीत सहभागी झाले.

Updated: Jul 13, 2016, 04:24 PM IST
खासदार राजू शेट्टींनी विकला भाजीपाला title=

पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये भाजीपाल्याची विक्री केली. व्यापाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी शेट्टी स्वतः भाजीपाला विक्रीत सहभागी झाले. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते यावेळी त्यांच्याबरोबर उपस्थित होते. व्यापाऱ्यांचं भांडण सरकारशी आहे. त्यामुळे त्यांनी शेतकरी आणि ग्राहकांना वेठीस धरु नये. असं आवाहन शेट्टी यांनी यावेळी केलं.  दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रयत्नांमुळे शेत मालाची आवक वाढली असल्याचा दावा यावेळी करण्यात आला. पुणे मार्केटयार्डच्या बंदच्या तिसऱ्या दिवशी 400 गाड्या भाजीपाल्याची आवक झाली आहे.

पाहा व्हिडिओ