टीव्ही मालिका पाहून सूनेने केली सासूची हत्या

शहरात भरदिवसा झालेल्या वृद्ध महिलेच्या हत्येचा धक्कादायक उलगडा झालाय. याप्रकरणी फिर्याद देणाऱ्या सुनेनंच सासूला ठार केल्याचं निष्पन्न झाले आहे.

Updated: May 21, 2016, 06:59 PM IST
टीव्ही मालिका पाहून सूनेने केली सासूची हत्या title=

मनमाड : शहरात भरदिवसा झालेल्या वृद्ध महिलेच्या हत्येचा धक्कादायक उलगडा झालाय. याप्रकरणी फिर्याद देणाऱ्या सुनेनंच सासूला ठार केल्याचं निष्पन्न झाले आहे.

काल माधवनगर भागात निलम जयस्वाल या ६० वर्षांच्या महिलेची गळा दाबून हत्या झाली होती. त्यांची सून शितल हिनेच पोलिसांना बोलावलं आणि चोरानं आपल्या सासूला मारलं, आपल्यावर चाकूनं वार केले आणि पळ काढला असं सांगितले.

मात्र त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात शितलनेच उशीनं तोंड दाबून सासूची हत्या केल्याचं समोर पुढे आले. टीव्ही मालिका पाहून तिनं हा कट रचल्याचंही स्पष्ट झालंय.