नवी मुंबई: आई, वडील आणि मुलगाही विजयी

नवी मुंबई महानगरपालिका काही नगरसेवकांसाठी आपलं 'सेकंन्ड होम' होणार आहे. कारण जर एकाच कुटुंबातील तीन सदस्य एकाच वेळी महापालिकेत उपस्थीत राहणार असतील ते त्यांच्यासाठी 'सेकंन्ड होम'प्रमानेच असणार आहे.

Updated: Apr 23, 2015, 06:01 PM IST
नवी मुंबई: आई, वडील आणि मुलगाही विजयी title=

नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिका काही नगरसेवकांसाठी आपलं 'सेकंन्ड होम' होणार आहे. कारण जर एकाच कुटुंबातील तीन सदस्य एकाच वेळी महापालिकेत उपस्थीत राहणार असतील ते त्यांच्यासाठी 'सेकंन्ड होम'प्रमानेच असणार आहे.

नवी मुंबई महानगर पालिका निवडणुकीत एकाच घरातील तीन जणांनी निवडून येण्याचा पराक्रम केलाय. मनोहर मढवी आणि विनया मढवी हे नवरा बायको तर निवडून आलेच पण त्यांचा मुलगा करण मढवीही विजयी झाले आहेत. विजयी झालेले ही तिनही उमेद्वार शिवसेनेचे आहेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.