सटाणा : घरासमोर विक्रीसाठी आलेल्या कुल्फीवाल्याकडून घेतलेली मटका कुल्फी खाल्ल्याने पन्नासहून अधिक मुलांना विषबाधा झालीय.
सटाणा इथल्या नामपूर परिसरात ही घटना घडलीय. कुल्फी खाल्ल्यानंतर या मुलांना जुलाब आणि उलट्याचा त्रास जाणवू लागला. या मुलांना तात्काळ नामपूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.
या सर्व मुलांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान ही कुल्फी दूषित पाण्यापासून तयार करण्यात आल्याने मुलांना त्रास झाल्याचे समोर आलंय.