राज्यात कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात मान्सून बरसतोय

राज्यात कोकणसह मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रात काही भागात मान्सून दाखल झाला धुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या कोकणातल्या तीनही जिल्ह्यांत मान्सून पोहोचलाय. 

Updated: Jun 13, 2015, 09:29 AM IST
राज्यात कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात मान्सून बरसतोय title=

मुंबई : राज्यात कोकणसह मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रात काही भागात मान्सून दाखल झाला धुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या कोकणातल्या तीनही जिल्ह्यांत मान्सून पोहोचलाय. 

मुंबई आणि ठाण्यातदेखील तो सक्रीय झालाय. तर मध्य महाराष्ट्रात सातारा, सांगली आणि कोल्हापुरपर्यंत मान्सून पोचलाय. गुरुवार रात्रीपासून मुंबईत मान्सूननं हजेरी लावली. मात्र शुक्रवारी दुपारनंतर पाऊस पुन्हा गायब झाला. त्यामुळं सकाळी पावसाच्या आणि दुपारी घामाच्या धारांनी मुंबईकरांना चिंब केलं. कोकणातही मान्सून दाखल झाला असला, तरी त्याच्या लपंडावामुळं शेतकरी चिंतेत आहे. 

तर वीकेंडला मुंबईत पावसाची धुवाधार सुरु आहे. पहाटेपासूनच मुंबई आणि उपनगरात जोरदार पाऊस सुरु आहे. मुंबईत उपनगरात सर्वच भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. मुंबईत सकाळी सातपर्यंत २६.२ मिमी पावसाची नोंद झालीय.. पूर्व उपनगरात २९.३७ मिमी तर पश्चिम उपनगरात २२ मिमी पावसाची नोंद झालीय. मुंबई आणि उपनगरात दिवसभर मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.