मंत्री बबनराव लोणीकर यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा

 पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 18, 2017, 10:23 AM IST
मंत्री बबनराव लोणीकर यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा title=

जालना : राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंठा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

दोन दिवसांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषदेसाठीच्या मतदानासाठी पाटोदा गावातल्या मतदान केंद्रात मंत्री लोणीकर यांनी प्रवेश केला. त्यावेळी केंद्र प्रमुखाने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आली आहे.