'मायक्रोसॉफ्ट'ची महाराष्ट्र वासियांना खुशखबर!

क्लाऊड डेटा सेवेचा सर्व्हर भारतात लावल्याची घोषणा मायक्रोसॉफ्टनं मंगळवारी केलीय. यावेळी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित होते. 

Updated: Sep 30, 2015, 08:56 AM IST
'मायक्रोसॉफ्ट'ची महाराष्ट्र वासियांना खुशखबर! title=

मुंबई : क्लाऊड डेटा सेवेचा सर्व्हर भारतात लावल्याची घोषणा मायक्रोसॉफ्टनं मंगळवारी केलीय. यावेळी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित होते. 

भारतात मायक्रोसॉफ्टचे एकूण तीन सर्व्हर लवकरच दिसतील. यातील दोन महाराष्ट्रात तर तीसरा सर्व्हर चेन्नईमध्ये स्थापित केला जाईल. 

महाराष्ट्रातील एक सर्व्हर मुंबई आणि दुसरा सर्व्हर पुणे इथं असेल. महाराष्ट्रात पायाभूत सुविधा चांगल्या असून ग्राहकही मोठ्या प्रमाणात असल्यानं या राज्यात क्लाऊड डेटा सर्व्हिसचे दोन सर्व्हर उभारण्याचा निर्णय घेतल्याचं मायक्रोसॉफ्ट इंडियाचे अध्यक्ष भास्कर प्रामाणिक यांनी स्पष्ट केलंय. 

या सर्व्हरमुळे मीडिया आणि एन्टरटेन्मेंटच्या विस्ताराला मोठी संधी मिळणार आहे. या सर्व्हरमध्ये साठवण्यात आलेली माहिती ही संपूर्णपणे मालकाच्या हाती असणार आहे. 

सर्व्हर उभे करण्यासाठी राज्य सरकारने मायक्रोसॉफ्टला जागा उपलब्ध करून दिली. त्या मोबदल्यात कंपनी अमरावतीमधील मेळघाटमध्ये डिजीटल गाव उभं करण्यासाठी राज्य सरकारला मदत करणार आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.