मुंबई : मुंबई नाशिक महामार्गावर गेली तीन वर्ष सुरू असलेल्या माणकोली उड्डाण पूलाच्या एका बाजूनं आज पासून वाहतूक सुरू झालीय.
सकाळी अकराच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुलाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, खासदार कपिल पाटील यांच्यासह परिसरातले अनेक मान्यवर उपस्थित होते.
पूल सुरु झाल्यानं ठाणे-भिवंडी बायपासवर होणारी कमालीची वाहतूक कोंडी आता कमी होण्यास मदत होणार आहे. या पुलावरून वाहतूक सुरु झाल्यानं नाशिककडे जाणाऱ्या हजारो प्रवाशांचा वाहतूक कोंडीमुळे मोडणारा किमान अर्धा तास वाचणार आहे. तब्बल १८० कोटी रुपये या प्रकल्पासाठी खर्च करण्यात आलेत.