दोन वर्षाच्या मुलीसमोर त्याने केली पत्नीची हत्या

आपल्या दोन वर्षांच्या मुलीसमोर पत्नीची निर्घुण हत्या केलीची धक्कादायक घटना जालन्यात घडलीये. अशोक लखनलाल सुरा असं या आरोपीचं नाव आहे. 

Updated: Jun 20, 2016, 11:43 AM IST
दोन वर्षाच्या मुलीसमोर त्याने केली पत्नीची हत्या title=

औरंगाबाद : आपल्या दोन वर्षांच्या मुलीसमोर पत्नीची निर्घुण हत्या केलीची धक्कादायक घटना जालन्यात घडलीये. अशोक लखनलाल सुरा असं या आरोपीचं नाव आहे. 

पत्नीची हत्या केल्यानंतर अशोकने पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली. पत्नी आपल्याशी छोट्या छोट्या गोष्टीवरुन वाद घालत असे त्यामुळे आपण पत्नीची हत्या केल्याची कबुली आरोपी पतीने दिली.

सहा वर्षापूर्वी अशोकचे लग्न झाले होते. त्यांना एक पाच वर्षांची तर एक दोन वर्षांची अशा दोन मुली आहेत. 

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनंतर पत्नीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून याप्रकरणाची पुढील चौकशी सुरु आहे. 

पोलिसांच्या माहितीनुसार, अशोक ओल्ड मोंढा परिसरात किराणा दुकाना चालवत असे. अशोकला दारु पिण्याचीही सवय होती.