पिंपरी चिंचवडमध्ये महेश लांडगे यांची लक्ष्मण जगताप यांच्यावर बाजी

अतिशय नाट्यमय घडामोडींनंतर पिंपरी चिंचवडमध्ये भाजपकडून आमदार महेश लांडगे गटाच्या नितीन काळजे यांचा महापौरपदाचा उमेदवार म्हणून अर्ज दाखल झाला. या निमित्ताने महेश लांडगे यांनी लक्ष्मण जगताप यांच्यावर बाजी मारल्याचं चित्र आहे. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 9, 2017, 11:27 PM IST
पिंपरी चिंचवडमध्ये महेश लांडगे यांची लक्ष्मण जगताप यांच्यावर बाजी   title=

पुणे : अतिशय नाट्यमय घडामोडींनंतर पिंपरी चिंचवडमध्ये भाजपकडून आमदार महेश लांडगे गटाच्या नितीन काळजे यांचा महापौरपदाचा उमेदवार म्हणून अर्ज दाखल झाला. या निमित्ताने महेश लांडगे यांनी लक्ष्मण जगताप यांच्यावर बाजी मारल्याचं चित्र आहे. 

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही महापौर आणि उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. महापौरपदासाठी शाम लांडे यांचा तर उपमहापौरपदासाठी निकिता कदम यांचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. 

राष्ट्रवादीचे संख्याबळ 36 आहे तर भाजपचे संख्याबळ 77आहे. त्यामुळं भाजप सहज विजयी होणार असे चित्र असताना राष्ट्रवादीने निवडणुकीत उडी घेत आपली ही चर्चा व्हावी हा हेतू साध्य केलाय, तसंच निवडून येऊ असा दावा ही केलाय.

शहराचा भाजपचा पहिला महापौर कोण होणार याबाबत कमालीची उत्सुकता होती. आमदार महेश लांडगे आणि लक्ष्मण जगताप गटाकडून या पदासाठी जोरदार रस्सीखेच होती. अखेर 5 वाजता अर्ज भरण्याची वेळ असताना त्या पूर्वी काही वेळ आधी पालकमंत्री गिरीश बापट पालिकेत दाखल झाले आणि त्यांनी महेश लांडगे गटाच्या नितीन काळजे यांची उमेदवारी जाहीर केली. उपमहापौरपदासाठी शैलजा मोरे यांचा अर्ज दाखल केला. ही निवड एकमताने झाल्याचा दावा ही त्यांनी केला.

या निवाडीमुळं आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर महेश लांडगे काहीसे वरचढ झाल्याचे चित्र आहे..पण अजून ही स्थायी समितीची निवड बाकी आहे. आणि हजारो कोटींचे बजेट असलेली तिजोरी आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी जगताप यांनी माघार घेतल्याची चर्चा आहे.