महाड दुर्घटनेतील तीन मृतदेह हाती; तपासाची कक्षा वाढवण्याची आवश्यकता

महाड दुर्घटनेनंतर आता जवळपास ३३ तास उलटून गेलेत. आत्तापर्यंत समुद्रकिनाऱ्याजवळच्या स्थानिकांच्या मदतीनं दोन मृतदेह हाती लागलेत. 

Updated: Aug 4, 2016, 01:31 PM IST
महाड दुर्घटनेतील तीन मृतदेह हाती; तपासाची कक्षा वाढवण्याची आवश्यकता title=

महाड : महाड दुर्घटनेनंतर आता जवळपास ३३ तास उलटून गेलेत. आत्तापर्यंत समुद्रकिनाऱ्याजवळच्या स्थानिकांच्या मदतीनं तीन मृतदेह हाती लागलेत. 

उल्लेखनीय म्हणजे, यातील पहिला मृतदेह एसटी चालक श्रीकांत कांबळे यांचा आहे... आणि तो घटनास्थळापासून जवळपास १५० किलोमीटर लांब सापडला. तर दुसरा मृतदेह हरिहरेश्वर समुद्राजवळ सापडलाय. हा एका महिलेचा मृतदेह असून घटनास्थळापासून जवळपास १०० किलोमीटर अंतरावर तो सापडलाय. या महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. तर तिसरा मृतदेह केंबुर्लीजवळ सापडलाय. हादेखील एका महिलेचा मृतदेह आहे.


गूगल मॅपच्या साहाय्यानं ठिकाणांची ओळख

महत्त्वाचं म्हणजे, एनडीआरएफचं सर्च ऑपरेशन आत्तापर्यंत ४० किलोमीटरपर्यंत आंबेतच्या खाडीपर्यंत शोध सुरू होता. पण, कांबळे यांचा मृतदेह अपघात स्थळापासून जवळपास १५० किलोमीटर लांब सापडल्यानंतर आता तपासाची कक्षा वाढवण्याची आवश्यकता असल्याचं दिसतंय. 

पहिला मृतदेहाची ओळख पटली... 

महाड दुर्घटनेत वाहून गेगेल्या दोन एसटी बसेसपैंकी एका बस चालकाचा मृतदेह एनडीआरएफच्या हाती लागलाय. उल्लेखनीय म्हणजे, जवळपास १५० किलोमीटर लांब आंजर्ला समुद्रकिनाऱ्याजवळ हा वाहून गेलेला मृतदेह सापडलाय. श्रीकांत एस. कांबळे असं त्यांचं नाव आहे. जयगड-मुंबई (एमच-२० बीएल- १५३८) या गाडीचे चालक कांबळे यांच्या बॅचचा नंबर ८२३४ असा आहे. दुर्दैव म्हणजे, या घटनेत मुलाखतीसाठी निघालेला त्यांचा मुलगा महेंद्र कांबळे हादेखील याच गाडीतून प्रवास करत होता. मृतदेहाजवळ सापडलेल्या बॅचवरून या मृतदेहाची ओळख पटलीय.

दोन महिलांचे मृतदेह हाती... 

हरिहरेश्वरच्या किना-यावर आणखी एक मृतदेह सापडलाय. सकाळी किना-यावर हा मृतदेह वाहून आलाय. हा मृतदेह महिलेचा आहे. त्यांचं नाव शेवंती मिरगल असं यांचा असून त्या टव्हेरा गाडीतून प्रवास करत होत्या. सकाळी स्थानिक नागरिकांना हा मृतदेह सापडला. त्यानंतर प्रशासनाला याबाबतची माहिती कळवण्यात आली.

तर तिसरा मृतदेह महाडपासून तीन किलोमीटरवर असलेल्या केंबुर्लीत मिळालाय. त्यांचं नाव संपदा वाझे असल्याचं पुढे आलंय.