महाड दुर्घटना : एसटीचे चालक आणि त्यांचा पुत्र बेपत्ता

मुंबई-गोवा महामार्गावरील महाड-पोलादपूर दरम्यानचा ब्रिटीशकालीन जुना पूल मुसळधार पावसामुळे वाहून गेला. या पुलावरून जाणाऱ्या २ एसटी बसेसह इतर 8 ते 10 वाहने पुरात वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून २ जणांचे मृतदेह सापडले असून अजूनही २० जण बेपत्ता असल्याची शक्यता आहे.  

Updated: Aug 3, 2016, 05:10 PM IST
महाड दुर्घटना : एसटीचे चालक आणि त्यांचा पुत्र बेपत्ता title=

रायगड : मुंबई-गोवा महामार्गावरील महाड-पोलादपूर दरम्यानचा ब्रिटीशकालीन जुना पूल मुसळधार पावसामुळे वाहून गेला. या पुलावरून जाणाऱ्या २ एसटी बसेसह इतर 8 ते 10 वाहने पुरात वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून २ जणांचे मृतदेह सापडले असून अजूनही २० जण बेपत्ता असल्याची शक्यता आहे.  

जयगड-मुंबई (MH20 BN1538) या एसटीचे चालक एस. एस. कांबळे हे त्यांच्या मुलासह या बसमध्ये होते. त्यांचा मुलगा हा देखील या मुलाखतीसाठी निघाला होता आणि तो ही त्यास बसमधून प्रवास करत असल्याचं बोललं जातंय. याच एसटीचे वाहक व्ही. के. देसाई आणि राजापूर-बोरीवली (MH40N 9739)चे चालक इ. एस. मुंढे, वाहक पी. बी. शिर्के या एस.टी. बसमध्ये होते. आणखी इतर 8 ते 10 वाहने वाहून गेली असल्याचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे.