महाड दुर्घटना : बेपत्ता तवेरा गाडीचा शोध लागला

महाडमधील सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत बेपत्ता झालेली तवेरा कारही सापडलीये. या तवेरा कारमध्ये दोन मृतदेह असल्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

Updated: Aug 14, 2016, 03:27 PM IST
महाड दुर्घटना : बेपत्ता तवेरा गाडीचा शोध लागला title=

महाड : महाडमधील सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत बेपत्ता झालेली तवेरा कारही सापडलीये. या तवेरा कारमध्ये दोन मृतदेह सापडलेत. हे दोन्ही मृतदेह पुरुषांचे आहेत. 

MH04GD7837 हा या तवेरा गाडीचा क्रमांक आहे. ही गाडी बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. 

घटना घडली त्या ठिकाणापासून 300 मीटर अंतरावर ही गाडी सापडलीये. या गाडीमध्ये ८ माणसे होती अशी माहिती समोर आलीये.