भाचीसोबत प्रेमविवाह , युवकाचे अपहरण करून हत्या

भाचीसोबत प्रेमविवाह केल्याच्या रागातून युवकाचे अपहरण करून त्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये उघडकीस आला आहे.

Updated: Dec 13, 2016, 11:39 PM IST
भाचीसोबत प्रेमविवाह , युवकाचे अपहरण करून हत्या  title=

पिंपरी-चिंचवड : भाचीसोबत प्रेमविवाह केल्याच्या रागातून युवकाचे अपहरण करून त्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये उघडकीस आला आहे.

याप्रकरणी आरोपी सतीश ठोंबरे याला निगडी पोलिसांनी ताब्यात घेतलंय. सतीशची भाची मोनिका ठोंबरेने सागर कवितकेशी प्रेमविवाह केला होता. हा विवाह सतीश ठोंबरे यांना मान्य नव्हता. काही दिवसांपूर्वी सागर आणि सतीश यांच्यात यावरून वादही झाला होता.

 त्यानंतर सतीश ठोंबरे याने सागरचे त्याच्याच गाडीतून अपहरण करून त्याची हत्या केली. सागरच्या पत्नीने दोन दिवसांपूर्वी सागरच्या अपहरणाची तक्रार दाखल केली होती. त्या तपासातच सतीश ठोंबरेने सागरची हत्या केल्या निष्पन्न झाले.