विरारमध्ये ‘लव्ह जिहाद’चा धक्कादायक प्रकार उघड

विरारमध्ये एक धक्कादायक लव्ह जिहादचा प्रकार समोर आला आहे. एका १५ वर्षाच्या मुलीला २६ वर्षाच्या मुस्लीम मुलाने लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले. जेव्हा मुलगी गरोदर राहिली तेव्हा धर्म परिवर्तन कर तेव्हा मी लग्न करणार अशी अट घातली. पण मुलीने  नकार दिल्यावर हा युवक फरार झाला. या बाबत पीडित मुलीनी  विरार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Updated: Sep 12, 2014, 01:42 PM IST
विरारमध्ये ‘लव्ह जिहाद’चा धक्कादायक प्रकार उघड title=

मुंबई : विरारमध्ये एक धक्कादायक लव्ह जिहादचा प्रकार समोर आला आहे. एका १५ वर्षाच्या मुलीला २६ वर्षाच्या मुस्लीम मुलाने लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले. जेव्हा मुलगी गरोदर राहिली तेव्हा धर्म परिवर्तन कर तेव्हा मी लग्न करणार अशी अट घातली. पण मुलीने  नकार दिल्यावर हा युवक फरार झाला. या बाबत पीडित मुलीनी  विरार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पीडित मुलगी विरार पूर्व भागात आई वडील आणि तीन बहिणी बरोबर राहते.  या १५ वर्षीय पीडिताच्या घराशेजारी इमिटेशन ज्वेलरी बनवणाऱ्या एका कंपनीत काम करणाऱ्या सुजल संतरा नावाचा युवकाशी ओळख होती. या युवकाने पीडित मुलीशी संबध वाढून तिच्यावर बळजबरी करून शाररीक संबध ठेवले. सुजलने या पीडित मुलीची जाहिद नावाच्या मुलाबरोबर तिची ओळख करून दिल्याचे पीडित मुलीच्या बहिणीने सांगितले.

जाहिदबरोबर ओळख झाल्यावर तिचे जाहिदबरोबर प्रेम संबध जुळले, जाहिदशी संबध जुळल्याने पीडिताने सुजल बरोबर संबध तोडले. जाहिद तिला आपल्या प्रेमाच्या आकाभाका देत मी तुझ्याबरोबर लग्न करेन असे सांगून तिच्याबरोबर शारीरिक संबध ठेवले. यातून मुलगी गरोदर राहिली. जेव्हा लग्नाची वेळ आली तेव्हा जाहिदने तिला मुस्लिम धर्म स्वीकारण्याची  अट घातली. या अटीमुळे मुलीने आपल्या कुटुंबियांना भीतीमुळे काहीच सांगितले नाही, असही पीडित मुलीच्या बहिणीने सांगितले. 

१ सप्टेंबर रोजी जाहिदने मुलीच्या घरी फोन केला, त्यावेळी मुलीच्या बहिणीने फोन उचलला तेव्हा जाहिदने तिला सांगितले की, तुज्या बहिणीच्या पोटात ते मुलं आहे ते माझे आणि तिला मुस्लिम धर्मात यायला सांग, यावेळी सर्व घटना समोर आली. तिच्या कुटुंबियांनी विरार पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली.

विरार पोलिसांनी या प्रकरणात काहीही सांगण्यास नकार दिला आहे. या प्रकरणात विरार पोलिसांची भूमिका संशयित वाटत आहे. कारण या प्रकारात पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली आणि 24 तासानंतर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपी सुजल संतरा याला अटक केली आहे. तर आरोपी जाहिद फरार आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x