मुंबई : कल्याण - डोंबिवली महानगरपालिका निवडणुकींबरोबरच राज्यातील ५८ नगरपरिषदा निवडणुकीचे निकाल आज लागले. या निवडणुकीत सत्ताधारी भाजपाने सर्वाधिक १० नगरपरिषदा जिंकल्या असल्या तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने २१ नगरपरिषदा जिंकून सत्ताधारी भाजपाला धक्का दिला आहे.
अधिक वाचा : पालिका निवडणुका : राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची बाजी, भाजपाला धक्का
त्याशिवाय भाजपाच्या नेत्यांच्या जिल्ह्यातच पक्षाला मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागपूर जिल्हा, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा जालना जिल्हा आणि पंकजा मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात भाजपाची पिछेहाट झाली आहे.महानगरपालिका आणि नगरपरिषदा निवडणुकांचे निकालने जल्लोष करावा असे वातावरण सत्ताधारी भाजपामध्ये नाही. राज्यातील ५८ नगरपालिकांच्या निवडणूक निकालावर नजर टाकल्यास ही बाब लक्षात येईल.
राज्यातील महापालिका आणि नगरपंचायत निवडणुकीचा निकाल लागण्यास सुरुवात झाली आहे. एकीकडे कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर महापालिका निवडणुकांची मतमोजणी सुरू असताना राज्यभरातल्या नगर पंचायतींचे निकालही हाती येत आहे. सर्वात धक्कादायक निकाल बीड जिल्ह्यात लागलेत. जिल्ह्यातल्या ४ नगर पंचायतींपैकी ३ पंचायती राष्ट्रवादीनं ओढून आणल्यात. विदर्भातही भाजपाची पिछेहाट झाल्याचं दिसतंय.
लाईव्ह अपडेट पाहा
दुपारी १.४५
पुणे : कोंढवा पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसच्या रईस सुंडके विजयी
दुपारी १.३२
मराठवाडा : परभणी - पालम नगरपंचायत : घनदाट मित्रमंडळ ६, राष्ट्रवादी ४, शहर आघाडीला ३, भाजपला २ , शिवसेना १, अपक्ष १
दुपारी १.३०
नांदगांव खंडेश्वर नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस विजयी
काँग्रेस - ७
भाजपा - ४
अपक्ष - ३
शिवसेना - २
राष्ट्रवादी - १
दुपारी १.३०
भातकुली नगरपंचायत निवडणुकीत आ.रवि राणा यांच्या युवा स्वाभिमान संघटनेचा विजय
युवा स्वाभिमानी संघटना - ८
कांग्रेस - ४
शिवसेना - ३
अपक्ष - २
दुपारी १.२९
चंद्रपूर - पोंभूर्णा नगरपंचायत निकाल , एकूण जागा १७, भाजप ९, काँग्रेस ६, अपक्ष २
दुपारी १.२८
यवतमाळ - ६ नगर पंचायतमध्ये प्रत्येकी १७ प्रमाणे एकूण १०२ उमेदवार, विजयी उमेदवार
भाजप - २९
कांग्रेस - २७
शिवसेना - १४
राष्ट्रवादी काँग्रेस - ०९
अपक्ष - २३
दुपारी १.१८
भंडारा : लाखांदूर नगरपंचायत : भाजप - १०, काँग्रेस -५ , राष्ट्रवादी - १ अपक्ष - १
दुपारी १.१७
भंडारा : मोहाडी नगरपंचायत : भाजप ३ , काँग्रेस - १२, राष्ट्रवादी - १, अपक्ष - १
दुपारी १.०९
अमरावती - तिवसा नगरपंचायत मतदार संघात काँग्रेसचा विजय, काँग्रेस - ११, शिवसेना - ४ आणि राष्ट्रवादी - १, माकप - १
दुपारी १.०८
धारणी नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचा दणदणीत विजय, राष्ट्रवादी - ८, भाजप - ४, काँग्रेस ३ आणि शिवसेना - २
दुपारी १२.५२
पुणे : चाकण नगरपरिषदेत प्रथम निवडणूक, राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात सेना
शिवसेना - ८ , भाजप- १, राष्ट्रवादी काँग्रेस- ७
अपक्ष- ६, एकूण - २२
दुपारी १२.४३
अकोले : अकोले नगरपंचायतीवर राष्ट्रवादीची सत्ताराष्ट्रवादी ४ , सेना-भाजपचे ३ विजयी
दुपारी १२.४२
लातूर - जळकोट नगरपंचायत निकाल, काँग्रेस एका जागेवर विजयी
दुपारी १२.४२
कर्जत महापालिका निकाल
भाजप ५, काँग्रेस ३, इतर १
दुपारी १२.४०
धुळे- साक्री पंतायत निकाल
काँग्रेस-राष्ट्रवादी १६ जागांवर विजयी
भाजपला एकही जागा नाही
दुपारी १२.४०
पारनेर नगरपंचायत निकाल
शिवसेनेला ५ जागांवर आघाडी
दुपारी १२.४०
वर्धा: कारंजा नगरपंचायत निवडणूक
काँग्रेस ३, भाजप १ जागेवर आघाडीवर
दुपारी १२.४०
नाशिक : देवळा नगरपंचायत
देवळा विकास आघाडी - ९ , जनशक्ती - ३, अपक्ष - ५
दुपारी १२.२१
रत्नागिरी : शिवसेनेतून राष्ट्रवादीत दाखल झालेले उमेश शेट्ये विजयी झालेत. पोट निवडणुकीत शिवसेना - २, राष्ट्रवादी - २ जागांवर विजयी, एकूण ४ जागा
ऋतुजा देसाई ( १८२८) , पूजा सुर्वे (१७९०)- शिवसेना तर उमेश शेट्ये (१८५१) , रुबीना मालवणकर (१७७४) - राष्ट्रवादी
दुपारी १२.२०
जालना : घनसावंगी नगरपालिका निकाल
राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत, राष्ट्रवादी काँग्रेस -१२, भाजप २, इतर ३
दुपारी १२.१६
नागपूर : हिंगणा - एकूण जागा - १७ , भाजप - ११; राष्ट्रवादी - ६. सर्व निकल जाहीर
दुपारी १२.१५
नागपूर : भिवापूर नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेस - ५ जांगावर विजयी, भाजप - ३, शिवसेना - ४, बहुजन सम्मान पार्टी - ३, अपक्ष - २, सर्व १७ जागांचे निकाल जाहीर
दुपारी १२.०८
नाशिक - चांदवड नगरपंचायत निवडणूक निकाल, १७ पैकी शिवसेना - ३, भाजप - ५, काँग्रेस - ४, राष्ट्रवादीने २ जागा जिंकल्या, ३ अपक्ष उमेदवार विजयी
दुपारी १२.०२
मराठवाडा - जालना, जाफराबाद नपरपंचायतीमध्ये भाजपला धक्का, भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांना दे धक्का
राष्ट्रवादी काँग्रेसला जाफराबाद नगर पंचायतीत स्पष्ट बहुमत,
१७ पैकी राष्ट्रवादीला १० जागा,सेना -भाजपला प्रत्येकी १, काँग्रेसला - ३ तर २ जागी अपक्ष विजयी.
सकाळी ११.५१
लातूर : देवणी नगरपंचायत - भाजप - ७, काँग्रेस - ५, एमआयएम - १, अपक्ष - ३
सकाळी ११.५०
कर्जत नगरपंचायतीवर भाजपचे कमळ
सिंधुदुर्गातील निकाल
कसई-दोडामार्ग नगरपंचायतीत शिवसेना-भाजप युतीची सत्ता
युतीला तब्बल १० जागा , आघाडीला ६ जागा, मनसे १ , युतीच्या कार्यकर्त्यांचा दोडामार्गात जल्लोष
वाभवे-वैभववाडीत काँग्रेसला सर्वाधिक ६ जागा, भाजपा ३, शिवसेना २ आणि ग्रामविकास आघाडीचा २ जागांवर विजय , बिनविरोध ४ पैकी १ काँग्रेस, १ भाजप आणि २ ग्रामविकास आघाडी
वाभवे -वैभववाडी नगरपंचायत निवडणूक निकाल जाहीर
प्रभाग ६ मधून काँग्रेसच्या संपदा राणे विजयी,
प्रभाग ८ मधून भाजपच्या मनिषा मसुरकर विजयी
प्रभाग ९ मधून काँग्रेसच्या शोभा लसणे विजयी
प्रभाग १० मधून काँग्रेसच्या दीपा गजबार विजयी
प्रभाग ११ मधून सेनेचे संतोष परब विजयी
प्रभाग १२ मधून भाजपच्या सरिता रावराणे विजयी
प्रभाग १३ मधून कॉंग्रेसच्या समिता कुडाळकर
प्रभाग १४ मधून अपक्ष रवींद्र तांबे यांचा विजय
कसई-दोडामार्ग नगरपंचायतीत आघाडीचे नानचे ३ मतांनी विजयी,
आघाडीच्याच उपमा गावडे विजयी
प्रभाग २ मधून भाजपच्या वैष्णवी रेडकर विजयी
प्रभाग १ मधून मनसेचे रामचंद्र ठाकूर यांचा ३ मतांनी विजय
प्रभाग ७ मधून भाजपच्या संध्या प्रसादी विजयी
प्रभाग ८ मधून शिवसेनेचे दिवाकर गवस अवघ्या १ मताने विजयी
प्रभाग ६ मधून राष्ट्रवादीच्या साक्षी कोरगावकर यांचा विजय
प्रभाग ५ मधून काँग्रेसच्या विनया म्हावलनकर विजयी
वैभववाडीत प्रभाग ५ मधून काँग्रेसचे संजय चव्हाण विजयी
प्रभाग १ मधून शिवसेनेचे रोहन रावराणे विजयी प्रभाग २ मधून भाजपचे संतोष माईणकर,
प्रभाग ४ मधून काँग्रेसच्या अक्षता जैतापकर विजयी
सकाळी ११.२५
मुरबाडमध्ये नगरपालिकेत भाजपची सरशी
भाजप ११, सेना-५, काँग्रेस-१, राष्ट्रवादी काँग्रेस-१
सकाळी ११.२४
हिंगणा नगरपरिषद - भाजपची दाणादाण. एकूण जागा - १७, जाहीर निकल - १४ ; राष्ट्रवादी - १२ ; भाजप - २
सकाळी ११.२३
बीडमध्ये भाजप दे धक्का, राष्ट्रवादीला ४ पैकी ३ जागांवर विजय
सकाळी ११.२२
नाशिकमधील निफाड नगरपंचायतीवर शिवसेना-भाजपची सत्ता
सकाळी ११.११
पुणे - चाकण पालिकेत शिवसेनेचा भगवा, ११ जागांपैकी ८ जागांवर शिवसेना आघाडीवर
सकाळी ११.१०
ठाणे - शहापूर नगरपंचातीत शिवसेनेचा भगवा, १५ जागांपैकी ११ जागांचे निकाल जाहीर, शिवसेना १० जांगवर विजयी
सकाळी ११.०५
वर्धा : कारंजा नगरपंचायत निवडणूक
काँग्रेस ३, भाजप १ जागेवर आघाडीवर
सकाळी ११.००
अहमदनगर - पारनेर नगरपंचायत निकाल
शिवसेनेला ५ जागांवर आघाडी
सकाळी १०.५१
रत्नागिरी - प्रभाग क्रमाक २ मधून शिवसेनेच्या ऋतुजा देसाई, पूजा सुर्वे विजयी
सकाळी १०.५०
रत्नागिरी - मंडणगड नगरपंचायतीच्या ८ जागांची मतमोजणी पूर्ण. ८ जागांवर राष्ट्रवादीने मारली बाजी
सकाळी १०.५०
कर्जत नगरपरिषद निकाल : भाजप ५, काँग्रेस ३, इतर १
सकाळी १०.४२
अकोले नगरपंचायतीवर राष्ट्रवादीची सत्ता
सकाळी १०.४५
वैभववाडी नगरपरिषद
प्रभाग १ - रोहण रावराणे - शिवसेना विजयी
प्रभाग २ - संतोष माईनकर - भाजप विजयी
प्रभाग ४ - अक्षता जैतापकर - काँग्रेस
प्रभाग ५ - संजय चव्हाण - काँग्रेस
प्रभाग ६ - संपदा राणे - काँग्रेस
प्रभाग ९ - शोभा लनसे - काँग्रेस
प्रभाग १० - दीपा गजोबार - काँग्रेस
सकाळी १०.२५
रत्नागिरीतील मंडणगड नगरपंचायतीत राष्ट्रवादीचा शिवसेनेला दे धक्का, बालेकिल्ल्यात मारली मुसंडी
सकाळी १०.४०
नाशिक जिल्ह्यातील चांदवड नगरपरिषद भाजप २, शिवसेना २, राष्ट्रवादी -१, अपक्ष - १
रत्नागिरीत विजय मिळाल्यानंतर शिवसेनेचे आमदार राजन साळवी आणि कार्यकर्ते जल्लोष साजरा करताना
सकाळी १०.३०
सिंधुदुर्ग - दोडामार्ग काँग्रेस - ४, शिवसेना - २, भाजप - २ मनसे -१
सकाळी १०.२५
रत्नागिरीतील मंडणगड नगरपंचायतीत राष्ट्रवादी आघाडीवर
सकाळी १०.२०
लातूर - जळकोट नगरपंचायत निकाल, काँग्रेस एका जागेवर विजयी
सकाळी १०.१५
अहमदनगरमधील अकोले नगरपरिषदेत राष्ट्रवादी ४, शिवसेना-भाजप ३ आणि अपक्ष १ विजयी
सकाळी १०.१५
रत्नागिरीत दोन ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार आघाडीवर
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.