४० फूट खोल विहिरीत बिबट्या पडला

रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील विलवडे गावात ४० फूट खोल विहिरीत बिबट्या पडला. काल रात्रीच्या सुमारास हा बिबट्या भक्ष्याचा पाठलाग करत जंगलातून गावात आला. त्यावेळी तोल जाऊन हा बिबट्या विहिरीत पडला. 

Updated: Aug 21, 2015, 04:58 PM IST
४० फूट खोल विहिरीत बिबट्या पडला title=

लांजा : रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील विलवडे गावात ४० फूट खोल विहिरीत बिबट्या पडला. काल रात्रीच्या सुमारास हा बिबट्या भक्ष्याचा पाठलाग करत जंगलातून गावात आला. त्यावेळी तोल जाऊन हा बिबट्या विहिरीत पडला. 

सकाळी काही कारणासाठी या विहिरीजवळ गेलेल्या हरिश्चंद्र पाटील यांना ही गोष्ट लक्षात आली. त्यानंतर पाटील यांनी वनविभागाला माहिती दिली. वनविभागाचे अधिकारी तात्काळ दाखल झाले, आणि या ४० फूट खोल विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्याचा यश आलं. 

जवळपास १० तासाहून अधिक काळ बिबट्या या विहिरीत पडला होता विहिरीत सापळा सोडून त्यात या बिबट्याला पकडण्यात आलं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.