कल्याणमध्ये ‘लेडीज स्पेशल’ रिक्षा!

कल्याणमध्ये महिला रिक्षा प्रवाशांसाठी नवा प्रयोग करण्यात आलाय. आता, लोकलप्रमाणे कल्याणमध्ये 'लेडीज स्पेशल रिक्षा धावणार आहे.

Updated: Dec 20, 2014, 01:26 PM IST
कल्याणमध्ये ‘लेडीज स्पेशल’ रिक्षा! title=

कल्याण : कल्याणमध्ये महिला रिक्षा प्रवाशांसाठी नवा प्रयोग करण्यात आलाय. आता, लोकलप्रमाणे कल्याणमध्ये 'लेडीज स्पेशल रिक्षा धावणार आहे.

कामानिमित्त बऱ्याच महिला शहरात येतात. त्यामुळं, कामाच्या वेळी किंवा घरी परतताना गर्दीच्या वेळी महिलांना रिक्षासाठी वाट पाहावी लागते... तर कधी काही पुरुष प्रवाशांच्या शेरेबाजीचाही सामना करावा लागतो.

या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेच्या ठाणे पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांनी महिलांसाठी स्वतंत्र रांग असावी, अशी सूचना केली. त्यानुसार आता कल्याण रेल्वे  स्थानकाच्या बाहेर महिलांसाठी विशेष रिक्षा रांग सुरू करण्यात आलीय.

या लेडीज स्पेशल रिक्षांचा शुभारंभ गुरूवारी सायंकाळी  करण्यात आला. या सोयीमुळे महिला प्रवाशांचा प्रवास आता सुखकर होणार आहे. सायंकाळी ५.०० ते रात्री १०.०० वाजेपर्यंत ही सेवा उपलब्ध असणार आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.