नाशिक: भाजपा खासदार किरीट सोमय्यांनी छगन भुजबळांवर आज नवे आरोप केलेत. भुजबळांचा बंगला अशोका बिल्डरच्या खर्चातून बांधण्यात आल्याचा दावा करत बिल्डर अशोक कटारिया यांची चौकशी करण्याची मागणी सोमय्यांनी केली आहे.
हायवेचा ठेका देण्याच्या व्यवहारातून भ्रष्टाचार झाल्याचा दावा सोमय्यांनी केलाय. याबाबत त्यांनी लाचलुचपत विभागाकडं तक्रार केलीय. दरम्यान, भुजबळांच्या बंगल्याबाहेर सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या बॅरिकेट्सपाशी किरीट सोमय्यांना थांबवण्यात आलं.
सुरक्षेसाठी हे बॅरिकेट्स अगोदरपासून आहेत. या मार्गानं भुजबळांच्या बंगल्याकडं जात असताना या बॅरिकेट्सपाशी सोमय्यांची गाडी थांबवण्यात आली.