कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेत सत्तेसाठी शिवसेना भाजपची युती होणार, अशी चर्चा सुरु असताना सेना, भाजप महापौरपदासाठी वेगवेगळे अर्ज भरणार असल्याचं समजतंय.
महापौर पदासाठी भाजपकडून राहुल दामलेंचे नाव आघाडीवर आहे तर सेनेकडून दीपेश म्हात्रे आणि रमेश म्हात्रे आघाडीवर असल्याचं समजतंय.
अधिक वाचा - भाजप-सेनेची 'कल्याण'मध्ये शिजली 'डाळ', मनसे 'उपाशी'
शिवसेना भाजपची बैठक पार पडली. शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची बैठक पार पडली... या बैठकीत युतीबाबत सकारात्मक चर्चा झाली. आता याबाबत अंतिम घोषणा करण्याचे अधिकार शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना देण्यात आलेत.
अधिक वाचा - केडीएमसी अपडेट : सेना-भाजपला हवी काँग्रेसच्या 'हाता'ची साथ
निकालानंतर आमचाच महापौर होईल असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला होता. त्यानंतर शिवसेनेसोबत येण्यास भाजपाला रस नसेल, तर आमचा मार्ग मोकळा आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिली होती. त्यामुळं या दोन्ही पक्षात युती होणार की कल्याण डोंबिवलीत सत्तेसाठी वेगळी समीकरणं एकत्र येणार का याकडं साऱ्यांच्या नजरा लागल्या होत्या. अखेर सत्तेसाठी शिवसेना भाजपमध्ये दिलजमाई झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय.
पक्षीय बलाबल...
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत 52 जागांसह शिवसेना एक नंबरचा पक्ष ठरलाय.... तर त्यापाठोपाठ 42 जागा मिळवणारा भाजप दुस-या स्थानी आहे.. सत्ता स्थापन करण्यासाठी 61 जागांची गरज आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.