उरले अवघे काही तास... कार्यकर्त्यांची शेवटच्या क्षणीची धावपळ!

कोल्हापूर आणि कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीचा प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे... प्रचार अंतिम टप्प्यात पोहचलाय... प्रचारासाठी अवघे काही तास बाकी राहिलेत... मतदार राजाला आकर्षित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसलीय.

Updated: Oct 30, 2015, 11:23 AM IST
उरले अवघे काही तास... कार्यकर्त्यांची शेवटच्या क्षणीची धावपळ! title=

कल्याण / कोल्हापूर : कोल्हापूर आणि कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीचा प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे... प्रचार अंतिम टप्प्यात पोहचलाय... प्रचारासाठी अवघे काही तास बाकी राहिलेत... मतदार राजाला आकर्षित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसलीय.

कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप, शिवसेना आणि मनसेनं प्रचारात चांगलाच जोर लावलाय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना आणि भाजपवर जोरदार टीका केली. शिवसेनेला निवडणुका आल्या की हिंदूत्वाची आठवण येते. गेल्या वीस वर्षांत शिवसेनेला सावरकरांच्या स्मारकाची का आठवण झाली नाही असा सवाल त्यांनी केलाय. 

तर कल्याणमध्ये घेतलेल्या सभेत उद्धव ठाकरेंनी मनसेवर हल्ला चढवला. कल्याण-डोंबिवलीत नाशिकची बतावणी अशा शब्दात त्यांनी राज ठाकरेंची खिल्ली उडवली. 

दुसरीकडे, कल्याण डोंबिवली प्रचारात सर्व ताकत झोकून देणाऱ्या शिवसेना भाजपचं कोल्हापूरकडे दुर्लक्ष झालं का असा सूरही उमटतोय. त्यामुळं आता अखेरच्या दिवशी रोड शो, चौक सभांमधून  आणि त्यानंतर थेट मतदारांशी संपर्क साधून त्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सारेच राजकीय पक्ष करताना दिसतील.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.