हिंगोली : केबीसी या कंपनीचे वसमत येथील एजंट बालाजी रुख्माजी गुजेवार यांचा हृदयविकाराने मंगळवारी रात्री मृत्यू झाला. त्यांची पैसै तिप्पट करून देण्याची प्रलोभने दाखवून फसवणूक झाल्याचं सांगण्यात येत आहे.
गुजेवार हे वसमत येथे केबीसीचे एजंट म्हणून काम करीत होते. विविध आमिषे दाखवत हजारो जणांना आकर्षित करीत कोट्यवधींची माया गोळा करून नाशिकस्थित केबीसी नामक कंपनीकडून फसवणुक झाल्याचे गुन्हे आता दाखल होत आहेत.
मागील काही दिवसांपासून ग्राहकांच्या पैसे परत घेण्यासाठी गुजेवार यांच्याकडेही चकरा मारल्या होत्या.
मात्र, चार दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यात आणि मंगळवारी परभणी येथे केबीसीच्या संचालकांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यांना रात्री हृदयविकाराचा त्रास सुरू झाला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
एकट्या वसमत शहरात सुमारे आठशे एजंटांच्या माध्यमातून सुमारे दीडशे कोटी रुपयांचा गल्ला केबीसीने गोळा केला असल्याचं सांगण्यात येत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.