कणकवलीत आंदोलक-पोलीस आमनेसामने, नितेश राणे यांना अटक

सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांचे भात शासनाने खरेदी न केल्याने काँग्रेस आमदार नितेश राणे आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, प्रशासनाने दुर्लक्ष केले होते. आज शेतकरी आणि राणे समर्थक कार्यकर्त्यांनी पोलिसांचे कडे तोडत गोडावूनकडे धाव घेतली. यावेळी पोलीस आणि आंदोलक आमनेसामने आलेत. तर आंदोलकांनी मुंबई-गोवा महामार्ग रोखला. त्यामुळे कणकवलीत तणावाचे वातावरण होते.

Updated: May 27, 2015, 01:57 PM IST
कणकवलीत आंदोलक-पोलीस आमनेसामने, नितेश राणे यांना अटक title=

कणकवली : सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांचे भात शासनाने खरेदी न केल्याने काँग्रेस आमदार नितेश राणे आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, प्रशासनाने दुर्लक्ष केले होते. आज शेतकरी आणि राणे समर्थक कार्यकर्त्यांनी पोलिसांचे कडे तोडत गोडावूनकडे धाव घेतली. यावेळी पोलीस आणि आंदोलक आमनेसामने आलेत. तर आंदोलकांनी मुंबई-गोवा महामार्ग रोखला. त्यामुळे कणकवलीत तणावाचे वातावरण होते.

आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्ते आणि शेतकरी रस्त्यावर उतरलेत आणि कणकवलीत गोडाऊनच्या दिशेने शेकडो आंदोलकांनी कूच केली. पालकमंत्री आरामात...भात पडलाय गोदामात, अशा घोषणा पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात दिल्यात. सावंतवाडी तालुक्यातील डेगवे इथलं भात गोडावून खाली करायला गेलेल्या आंदोलकांना पोलिसांनी रोखले. त्यावेळी आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी केली. राणे अधिक आक्रमक झाल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात तणावाच वातावरण होते.

काही ठिकाणी जाळपोळ करण्यात आली. कणकवलीत आंदोलक आणि पोलीस आमनेसामने आलेत. यावेळी आंदोलकांना पोलिसांनी घेरले. मात्र, पोलिसांचे कडे तोडून आंदोलकांची गोडावूनकडे धाव घेतली. त्यामुळे पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड केली. याचवेळी आमदार नितेश राणे यांनाही पोलिसांनी घेरले. त्यामुळे आंदोलक अधिक आक्रमक झालेत. त्याचवेळी पोलिसांमध्ये झटापट झाली. आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. 

दरम्यान, कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी मुंबई गोवा महामार्ग रोखला. यावेळी आमदार नितेश राणे याचं मुंबई गोवा महामार्गावरच ठिय्या आंदोलन केले.  मुंबई गोवा महामार्गावर ठिय्या आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आमदार नितेश राणे यांच्यासह शेकडो आंदोलकांना पोलिसांनी अटक केली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.