केडीएमसी नगरसेवकांकडून जनतेच्या पैशाची उधळपट्टी

हत्तीवरुन सफारी, जहाजासमोरील फोटो सेशन हे वर्णन कोणत्याही सहलीच नाही तर केडीएमसीच्या नगरसेवकांच्या अभ्यास दौ-याचं आहे. तब्बल 33 लाख रुपये खर्च करुन आयोजित करण्यात आलेल्या केरळ दौ-यावरील नेगरसेवकांचा हा अनोखा अभ्यास सोशल मीडियाद्वारे चव्हाट्यावर आला आहे.

Updated: Nov 26, 2014, 07:22 PM IST
केडीएमसी नगरसेवकांकडून जनतेच्या पैशाची उधळपट्टी title=

कल्याण : हत्तीवरुन सफारी, जहाजासमोरील फोटो सेशन हे वर्णन कोणत्याही सहलीच नाही तर केडीएमसीच्या नगरसेवकांच्या अभ्यास दौ-याचं आहे. तब्बल 33 लाख रुपये खर्च करुन आयोजित करण्यात आलेल्या केरळ दौ-यावरील नेगरसेवकांचा हा अनोखा अभ्यास सोशल मीडियाद्वारे चव्हाट्यावर आला आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेत नगरसेवकांनी गेल्या चार वर्षांमध्ये विविध अभ्यास दौरे केले आहेत. त्यातून काय साध्य झाल हा संशोधनाचा मुद्दा असताना यंदा नगरसेवक केरळ दौ-यावर रवाना झाले आहेत. 55 नगरसेवक अभ्यास दौ-याच्या निमित्ताने केरळला रवाना झाले आहेत.

तेथील विविध विकास प्रकल्पांसह त्रिवेंद्रम महापालिकेला भेट दिली जाणार आहे. मात्र, सोशल मीडियामुळे समोर आलेल्या छायाचित्रांमुळे नगरसेवक अभ्यास दौ-यावर गेले आहेत की सहलीला हा सध्या कल्याण-डोंबिवलीमध्ये चर्चेचा विषय ठरलाय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.